पुणे – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान वि.दा. सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केलं. विशेष म्हणजे राहुल यांनी महाराष्ट्रात असतानाच हे विधान केलं. त्यामुळे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी राहुल गांधी यांचा निषेध नोंदविण्यात आला. तर अनेक ठिकाणी जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. मात्र पुण्यात आंदोलन करताना एका महिलेचा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं.
Video: अरेच्चा! राहुल गांधी बाजुलाचं, गोंधळलेल्या महिलेने सावरकरांच्या प्रतिमेवरच… pic.twitter.com/t9bwOLXzpR
— Ravindra A Deshmukh (@Rdeshmukh11) November 17, 2022
यावेळी बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने सारसबागेसमोरील सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन पुणे संपर्क प्रमुख अजय भोसले आणि शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. मात्र या आंदोलनाच्या वेळी उपस्थित महिलेने राजीव गांधी मुर्दाबादच्या घोषणा दिल्या.



