देहूगाव ( वार्ताहर ) सणांच्या व महत्त्वाच्या दिवशी देहू परिसरामध्ये वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष वाढत आहे.
विद्युत पुरवठा चोविस तास सुरळीत राहिला आहे असा ऐखादे दिवस वगळला तर वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्याने देहूकर नागरिक हैरण झाले आहेत .दिवाळी अथवा कोणताही सण असो किंवा पालखी सोहळा, बीज सोहळा, यात्रा अशा महत्त्वाच्या दिवशीही विद्युत पुरवठा खंडित होतेच हे जणू काळया दगडावरची पांढरी रेघच आहे. कोरोना महामारी संकटाचे निर्बंध पूर्णपणे शिथिल झाल्याने दोन वर्षानंतर सुरू झालेल्या उद्योग व्यवसाय ,सण, यात्रा मुळे परिस्थिती पूर्व पदावर येत आहे.
आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी सोहळा व कार्तिक एकादशी निमित्त रविवारी देहू मध्ये भाविकांची गर्दी होती मात्र ,दुपार पासुन खंडित झालेल्या विद्युत पुरवठयाने वैकुंठ स्थान व मुख्य मंदीरामध्ये भाविकांना दर्शन घेताना त्रास होत होते, देहूकर नागरिकांकडे येणारे भाविक, नातेवाईकांच्या वर्दळीमुळे देहूकर ही संतापले होते तर लघु व्यावसायिकांच्या व्यवसायावर होणारे परीणाम व नुकसानी मुळे रोष वाढत होते.
महावितरणाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दूरध्वनीने संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र समोरून कोणताच प्रतिसाद मिळत नव्हते. वारंवार खंडीत होणारा विज पुरवठा व महावितरणाच्या या सावळ्या गोंधळ कारभाराने नागरीकामेंध्ये रोष वाढत होता.




