मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारींविरोधात मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलन केलं. हुतात्मा चौक परिसरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राज्यपालांविरोधात घोषणाबाजी केली. काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान केल्यानं राज्यपालांविरोधात आंदोलन करण्यात आले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानानंतर राज्यभर आंदोलन करण्यात आली आहेत. मागील आठवड्यापासून राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. राज्यातून त्यांनी माफी मागावी अशी मागणी होत आहे. अशातच पुण्यात राज्यपालांविरोधात आंदोलन करण्यात आले. दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीसांवार निशाणा साधला आहे.



