- विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळणारी संस्था काळ्या यादीत
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या १३ शाळांमध्ये सावित्री महिला स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेला वारंवार लेखी, तोंडी स्वरुपात कळवूनही पोषण आहारामध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा होत नसल्याचा ठपका ठेवत या संस्थेला काळ्या यादीत टाकण्यात आले. संस्थेकडील शालेय पोषण आहाराचे काम काढून इस्कॉनच्या अन्नामृत फाऊंडेशनला देण्यात आले आहे. याबाबतचा आदेश आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी जारी केला आहे.
महापालिकेच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी या संस्थेकडून पुरवठा होत असलेल्या भातात काचेचा, प्लास्टिकचा तुकडा, आळ्या, केस सापडत असल्याबाबत कळविले. त्यामुळे या संस्थेला १२ ऑक्टोबर २०२२ रोजी अंतिम कारणे दाखवा नोटीस बजाविली. त्याचाही खुलासा मुदतीत सादर केला नाही. २२ नोव्हेंबर रोजी खुलासा करत शाळेतील मुख्याध्यापक, पर्यवेक्षक यांना भेटून यापुढे अशा प्रकारची चूक पुन्हा होणार नाही अशी हमी संस्थेने दिली.
माजी नगरसेवक संदीप कस्पटे यांनीही वाकड येथील कै. मारुती गेनू कस्पटे प्राथमिक शाळेमध्ये संस्थेकडून पुरविण्यात येत असलेल्या आहाराचा दर्जा निकृष्ट असून विद्यार्थी खात नसल्याची तक्रार केली होती. मोहननगर, वाकड शाळेच्या मुख्याध्यापकांनीही संस्थेबाबत तक्रार केली होती. संस्थेला पुन्हा १९ सप्टेंबर २०२२ रोजी कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली. वाकड येथील प्राथमिक कन्या
मात्र, काळभोरनगर येथील शाळेच्या मुख्याध्यापकांनी १५ नोव्हेंबर रोजी पुरवठा केलेल्या खिचडीमध्ये आळी सापडल्याबाबत कळविले. त्यामुळे संस्थेकडून निकृष्ट दर्जाच्या व आळीयुक्त पोषण आहाराचा पुरवठा होत असल्याचा प्रकार वारंवार समोर आले. त्यामुळे सावित्री महिला स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेला दिलेले पोषण आहार पुरवठ्याचे कामकाज काढून घेण्यात आले. या संस्थेस भविष्यात आहार पुरवठाबाबत निविदा भरण्यास प्रतिबंध करत काळ्या यादीतही टाकण्यात आले.




