पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेत प्रशासकीय राजवटीत राज्यातील सत्तातरानंतर आयुक्त शेखर सिंह परदेशी यांना पाठवण्यात आले. त्यानंतर त्यांच्याकडून भाजपचे नेते पुन्हा महापालिका लुटून खात असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस कडून वारंवार आरोप करण्यात येत आहेत. त्यातच जॅकवेल निविदेतील भ्रष्टाचारा विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने रान पेटवले असताना आता भाजप चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी या निविदेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत भ्रष्टाचारावर शिक्कामोर्तब केल्याची चर्चा शहरभर सुरू झाली आहे.
https://maharashtramaza.online/?p=161347
आमदार जगताप यांनी आयुक्तांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये म्हटले आहे की, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे आणि मोठ्या पद्धतीने पाणीपुरवठा विभागाच्या निविदा भरण्याच्या भानगडीत नवीन ठेकेदार पडत नाहीत. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होते. भामा-आसखेड जॅकवेल कामाच्या निवेदा प्रक्रिया ही अत्यंत अपारदर्शी व भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून पूर्ण केली आहे. प्रथमदर्शनी या कामात २० ते २५ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे आढळून येत आहे.
त्यामुळे जॅकवेलची निविदा प्रक्रिया तात्काळ स्थगित करण्यात यावी. या निविदा प्रक्रियेत पात्रता निकष व निष्पक्षपणे लावण्यात आलेले नसून फक्त एकाच कंत्राटदारास डोळ्यासमोर ठेवून व त्यांना का मिळावे यासाठी पाणीपुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने भ्रष्ट मार्ग निवडला आहे. या प्रकरणातील भ्रष्टाचाराची तात्काळ चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करावी निविदा प्रक्रियेतील पात्रता निकषाबाबत निविदास दाखल केलेल्या सर्व कंत्राद्वारांच्या पात्रता पडताळून घेण्यात यावेत. त्यानुसार निविदा प्रक्रिया पार पाडण्यात यावी यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान टाळणार आहे असे जगताप यांनी पत्रात म्हटले आहे.




