पुण्याचे गोल्डन गाइज (Golden Guys ) अशी ओळख असलेल्या सनी वाघचौरे आणि संजय गुजर या दोघांनी कलर्स टीव्ही वाहिनीवरील बिग बॉस 16 (Bigg Boss 16 ) मध्ये नुकतीच त्याने वायल्ड कार्डद्वारे एंट्री केली आहे. कलर्स टिव्हीच्या (Colors Tv) ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाउंटवरून याबाबत पोस्ट देखील करण्यात आली आहे.

अंगावर किलोने सोने घालणारे हे ‘गोल्डन गायज’ म्हणजेच सनी वाघचौरे (Sunny Waghchoure) आणि संजय गुजर (Sanjay Gujar). या दोघांच्या अंगावर सोने घालून फिरण्याच्या स्टाईलमुळे या दोघांचे फॅन्स भरपूर आहेत. सनी वाघचौरे याचे इंस्टाग्रामवर लाखापेक्षा अधिक 16 फॉलोअर्स आहेत. तर संजय गुजर याच्या इंस्टाग्राम अकाऊंटला 10 लाखापेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.
दोघेही काही ना कारणास्तव चर्चेत असतात. तसेच फिल्म प्रॉडक्शन हाऊसला हे दोघे फायनान्स करत असल्याचे देखील बोलले जाते. तसेच बॉलीवूडमध्ये त्यांची चांगली ओळख देखील आहे. या अगोदर तो काही रिअॅलिटी शो मध्ये देखील पाहायला मिळाले आहेत. विवेक ओबेरॉय सोबत देखील गोल्डन गायज् यांची घट्ट मैत्री आहे.
आपल्या अंगावर परिधान केलेल्या सोन्यामुळे पिंपरी चिंचवड येथील दोन्ही गोल्डन गायज् अल्पावधीतच सगळीकडे चर्चेचा विषय झाला. त्यानंतरच्या काळात त्याचे बॉलिवुड मधील अभिनेत्यांसोबत फोटो व्हायरल होऊ लागले. त्यामुळे d प्रसिध्दी आणखीच वाढली. त्याचे चाहते लाखांमध्ये झाले.




