देहूगाव,दि.२ (वार्ताहर ) देहू नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा रसिका स्वप्नील काळोखे आणि स्वीकृत नगरसेवक आनंदा काळोखे व रोहित काळोखे यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदांसाठी निवडणूक घेण्यात आली.
त्यानुसार हवेलीचे उपविभागीय अधिकारी संजय असवले यांची पिठासीन अधिकारी यांनी आज शुक्रवारी ( दि.२ ) सकाळी ११ वाजता निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. शितल अनिल हगवणे यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची उप नगराध्यक्ष पदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आले. तर स्वीकृत नगरसेवक म्हणून अक्षदा प्रकाश हगवणे व गणेश उत्तम मोरे यांची निवड झाली. यावेळी झालेल्या बैठकीत सर्व नगरसेवक उपस्थित होते. पिठासीन अधिकारी संजय असवले यांनी भेटवस्तू देऊन ही घोषणा केली. देहू नगरपरिषदेचे डॉ. प्रशांत जाधव उपस्थित होते.




