पिंपरी : ‘जिथे गरज तिथे हजर’ याप्रमाणे कार्य करत असलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील ओम नमः शिवाय सेवादान परिवाराच्या वतीने नुकतेच आंदर मावळ येथील कुसवली येथील सहारा वृद्धाश्रमास मदत करण्यात आली. येथील निराधार आजी-आजोबांना स्वेटर ,कान टोपी, औषधे, प्रथमोपचार साहित्य, धान्य व किराणा देण्यात आला.
पुणे जिल्ह्यातील अनाथाश्रमे, वृद्धाश्रमे, मतिमंद गॄह तसेच रस्त्यावरील कुत्रे-मांजरी,मोकाट जनावरे प्राणी संगोपन केंद्र आदी ठिकाणी मागील तीन वर्षापासून मदत देण्याचे कार्य ओम नमः शिवाय सेवादान परिवाराच्या वतीने करण्यात येते.
सहारा वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना समक्ष भेटून परिवाराचे प्रतिनिधी दिनेश धावर, दीपक वाघ ,अभिजीत शिंदे, ॲड शशिकांत गावडे, बालाजी शिंदे यांनी ही मदत सुपूर्द केली.



