पिंपरी : पिंपळे सौदागर येथील शिवार चौकातील रेनबो प्लाझा मधील दुकानात अचानक आग लागल्याने नागरिकांची पळापळ झाली. या ठिकाणी आग लागण्याची बातमी स्थानिक नगरसेवक नाना काटे यांना समजल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली अग्निशामक दलाला फोन करून आग विझवण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या.

शिवार चौकातील मुख्य बीआरटी रोड लगत असणाऱ्या रेनाबो प्लाझा येथील दुकानातील दुसऱ्या मजल्यावर अचानक आग लागल्याने नागरिकांची गर्दी जमा झाली. या दुकानासमोर लहान मोठे छोटे व्यवसायिकांचे दुकाने लावण्यात आली होती. आग लागल्यामुळे या ठिकाणी दुकानातील मालक साहित्य बाहेर काढण्याचे धावपळ करत होते. आग वाढत असताना अग्निशामक दल तातडीने या ठिकाणी दाखल झाले. यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
शिवार चौकातील रेनबो प्लाझा या इमारतीत गुरुवारी दुपारी साडेचारच्या सुमारास अचानक आग लागली. पाच मजली या इमारती हॉटेल तसेच विविध व्यावसायिक कार्यालय आहे. या कार्यालयांमध्ये काही कर्मचारी व नागरिक अडकले. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांकडून अशा व्यक्तीचे प्रयत्न सुरू आहेत.
आकुर्डी येथे अगरबत्तीच्या कारखान्याला लागलेली आग तिसऱ्या दिवशीही धुमसत असतानाच रहाटणीतील इमारतीत मोठी आग लागली. इमारतीच्या इलेक्ट्रिक केबलसाठी असलेल्या डक्टमधून धूर निघत असल्याचे काही जणांच्या निदर्शनास आले. पाहणी केली असता आग लागल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे इमारतीमधील सर्व कार्यालयांमधील कर्मचारी व नागरिकांना इमारती मधून बाहेर पडण्यासाठी आवाहन करण्यात आले. आग वाढल्याने इमारतीत मोठ्या प्रमाणात धूर झाला. याबाबत माहिती मिळतच अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी पाणी फवारून धूर कमी करण्याचा प्रयत्न केला. तसेच इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर काच फोडून इमारतीत प्रवेश केला. त्यानंतर नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू असून आग नियंत्रणात आणण्यासाठी कसरत केली जात आहे. दरम्यान, शिवार चौकात मोठी गर्दी झाली. वाहतूक पोलीस व नगरसेवक नाना काटे आणि सामाजिक पदाधिकाऱ्यांनी मदतीसाठी पुढाकार घेत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.




