मोशी : स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित गायत्री इंग्लिश मीडियम स्कुल अँड जुनिअर कॉलेज येथील विदयार्थ्यांनी ‘एक मूठ धान्य’ या उपक्रमा अंतर्गत मोशी येथील ‘वेद भवन’ या पाठशाळेस सदिच्छा भेट दिली. तसेच तेथील विदयार्थ्यांना मदत म्हणून गहू, तांदूळ, साखर इ. एकूण तीनशे किलो धान्य हस्तांतरीत केले.
भारतीय संस्कृतीत सहकार्य, सदभावना आणि अन्नदानास अनन्यसाधारण महत्व आहे. तसेच समाजातील काही अंशी उपेक्षित घटक दुर्लक्षित होऊ नये या उदात्त हेतूपरत्वे दरवर्षी एक मूठ धान्य’ हा उपक्रम दिवाळीनंतर गायत्री स्कुल मध्ये राबवला जातो. सदर उपक्रमास विद्यार्थी स्वेच्छेने धान्य एकत्रित करतात व ते धान्य समाजातील गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवले जाते.
सदरील उपक्रमा प्रसंगी मा. अध्यक्ष विनायक भोंगळे, सचिव संजय भोंगळे, संचालिका सौ. कविता कडू पाटील, विश्वस्त सौ. सरिता विखे पाटील, मुख्याध्यापक शशिकांत जोडवे, शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते. वेद भवन पाठशाळेचे व्यवस्थापक श्री. चंद्रकांत इंदलकर यांनी विद्यार्थ्यांना पाठशाळेबद्दल माहिती दिली तसेच उपस्थितांचे आभार मानले.




