:
पिंपरी : चिंचवडमधील मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी आले असता त्यांच्या चेहऱ्यावर शाई फेकली. यानंतर पोलिसांनी शाई फेकणाऱ्यांना ताब्यात घेतलं. या घटनेनंतर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मी कुणाला घाबरत नाही, हिंमत असेल तर समोरुन या, असं म्हटलं. दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्या तोंडावर शाई फेकणारा व्यक्ती कोण आहे, याबाबत माहिती मिळाली आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या व्यक्तिचं नाव मनोज भास्कर गरबडे असं आहे.
मनोज हा समता सैनिक दलाचा कार्यकर्ता असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान मनोजच्या सोबत विजय धर्मा ओव्हाळ आण धनंजय ईचगज या दोन कार्यकर्त्यांना देखील ताब्यात घेतलं आहे. मनोज गरबडेनं चंद्रकांत पाटील यांच्या तोंडावर शाई फेकली आणि तिथं घोषणाबाजी देखील केली. त्यानंतर पोलिसांनी लगेच त्याला ताब्यात घेतलं. दरम्यान मनोज गरबडेच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट सुरु झाल्या आहेत. अनेकजण त्याच्या समर्थनार्थ पुढं येत असल्याचं दिसत आहे.
मनोद गरबडेनं चंद्रकांत पाटलांच्या चेहऱ्यावर शाई फेकली. एका पदाधिकाऱ्याच्या घरातून ते कार्यक्रमस्थळी निघाले होते. तेंव्हाच मनोद गरबडेनं थेट त्यांच्या चेहऱ्यावर शाई फेकली अन् त्यांनी महात्मा फुलेंच्या घोषणा दिल्या. खरंतर विरोधी पक्ष आणि समविचारी संघटनांकडून चंद्रकांत पाटलांनी केलेल्या वादग्रस्त वळतव्याचा निषेध नोंदवला जाणार होता. त्यामुळं मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यातून ही शाईफेकीची घटना घडली. त्यानंतर पोलिसांनी शाई फेक करणाऱ्यांना ताब्यात घेतलं.




