रहाटणी : स्व.नेते गोपीनाथजी मुंडे यांच्या जयंती सप्ताह निमित्त रहाटणी शहरात रहाटणी प्रीमियर लीग (RPL) या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. परिसरातील इंटर सोसायटी मॅचेसचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेस ६ डिसेंबर रोजी दिमाखात सुरुवात झाली. RPL स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी विधानपरिषद आमदार उमाताई खापरे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी केले. स्पर्धेचे आयोजन माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते व शुभम नखाते युवा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख पाहुण्यांनी टीम परेड सोबत ओळख करून टॉस उडवून उद्घाटन केले. या स्पर्धेत ४८ संघ सहभागी झाले. या स्पर्धेत bhoomkshtij Society’ महिला संघाचा सहभाग सुद्धा लाक्षणिक होता. एकूण ७ दिवस ही स्पर्धा उत्साहात संपन्न पार पडली.
स्व.गोपीनाथजी मुंडे यांच्या १२ डिसेंबरला जयंती दिवशी अंतिम सामना पार पडला. याप्रसंगी खासदार अमर साबळे, मा.महापौर उषा (माई) ढोरे , नगरसेवक शत्रुघ्न बापू काटे, नगरसेवक मोरेश्वर शेंडगे, माजी नगरसेविका सविता चंद्रकांत नखाते, ह.भ.प. शारदाताई मुंडे, चिंचवड विधानसभा युवा मोर्चा अध्यक्ष राजदादा तापकीर, गणेश ढाकणे, सुभाष दराडे, हनुमंत साहेब, आयोजक शुभम चंद्रकांत नखाते युथ फाउंडेशनचे मान्यवर उपस्थित होते.
अंतिम सामन्याचे विजेते Wardhman Heights सोसायटीच्या संघाने घेतले तर उपविजेते Arena-29 सोसायटी संघाने जिंकले. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या व विजेते संघाना आकर्षक भेटवस्तू व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. विकासाची कामे करत असताना नागरिकांना मनोरंजन व खेळासाठी संधी व व्यासपीठ उभे करणेदेखील गरजेचे आहे. यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असे प्रतिपादन मा. नगरसेवक चंद्रकांत आण्णा नखाते यांनी केले.
यास्पर्धे दरम्यान नगरसेवक बाबा त्रिभुवन, नगरसेवक राजेंद्र गावडे, नगरसेवक अंबरनाथ कांबळे, नगरसेविका योगिता नागरगोजे, युवा महाराष्ट्र केसरी किशोर नखाते, दराडे साहेब, शंकर नढे , माऊली नढे, अरुण चाबुकस्वार, काळुराम नढे, दिपक नागरगोजे, अमोल नखाते, सुनील नखाते, अमोल नखाते, युवराज नखाते, संदीप नखाते, अनिल गोडांबे, ऋषिकेश नखाते, आकाश नखाते, गणेश ढाकणे, बापूसाहेब जाधव या मान्यवरांनी भेट दिली. स्पर्धेचे संपूर्ण आयोजन युवा नेते शुभम चंद्रकांत नखाते युथ फाऊंडेशन व कार्यकर्ते यांनी केले.




