पिंपरी : पुणे आणि पिंपरी-चिंचवड़ पोलीस आयुक्तांची बदली करण्यात आली आहे. विनयकुमार चौबे यांची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची कायदा व सुव्यवस्था महाराष्ट्र राज्य, मुंबई अप्पर पोलीस महासंचालक या पदावर बदली करण्यात आली.
अंकुश शिंदे हे सध्याचे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त असून त्यांच्या जागी विनयकुमार चौबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच विश्वास नांगरे पाटील, सह पोलीस आयुक्त, कायदा व सुव्यवस्था, बृहन्मुंबई यांची अप्पर पोलीस महासंचालक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य मुंबई या पदावर बदली करण्यात आली आहे.




