कराड (पारस पवार) ; महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नाने जिल्हा वार्षिक योजना सन २०२२-२३ मधून जनसुविधा व नागरी सुविधा योजनेतंर्गत कराड उत्तरसह तालुक्यातील विविध गावांमधील विकासकामांसाठी १ कोटी ७३ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. संबंधित कामांच्या प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्या आहेत. सदरची कामे लवकरच सुरू होणार आहे.
यामध्ये जनसुविधा योजनेअंतर्गत शिवाजीनगर येथील मांगवाडी ते वाघजाई मंदिरपर्यंतचा रस्ता खडीकरण करणे, पश्चिम उंब्रज येथील अंतर्गत रस्ते सुधारणा करणे, पाडळी येथे अंतर्गत रस्ता करणे, भुयाचीवाडी येथे अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे, हजारमाची ता. कराड येथे वार्ड क्र. ५ मध्ये रस्ता काँक्रिटीकरण व आरसीसी गटर बांधणे, वडगांव (उंब्रज) येथे हिंदू स्मशानभूमी अंतर्गत सोयी सुविधा करणे, वडोली निळेश्वर येथे बँक ऑफ बडोदा ते श्री गणेश मंदिरापर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरण करणे, खोडजाईमातानगर येथे स्मशानभूमीला वॉल कंपाऊंड बांधणे, कोर्टी येथे स्मशानभूमीमध्ये आरसीसी दहन शेड बांधणे, वराडे येथे स्मशानभूमी वेटींग शेड बांधणे, टेंभू येथे ग्रामपंचायत इमारत बांधणे,टकले येथे स्मशानभूमीशेजारी संरक्षक भिंतीसह घाट बांधणे, साप येथे बंदिस्त आरसीसी गटर बांधकाम करणे, धामणेर येथे मुस्लिम दफनभूमीस संरक्षक भिंत बांधणे, सुर्ली येथे स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता सुधारणा करणार आहेत.
तसेच वाठार किरोली येथे अंतर्गत रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसवणे, वांझोळी येथे अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे, चोराडे येथे स्मशानभूमी सुधारणा व अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे, पाडळी येथील रस्ता काँक्रिटीकरण करणे रक्कम, निनाम येथील कॅनॉल रस्ता मार्ग खडीकरण व डांबरीकरण करणे, पाडळी येथे अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे, आहे. साकुर्डी येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधणे, सैदापूर अंतर्गत रस्ता खडीकरण व काँक्रिटीकरण करणे, वारूंजी येथे सुरेश मारूती भोसले ते राजु यदु कांबळे यांचे घरापर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरण करणे, साकुर्डी येथे अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करण्यास मान्यता मिळाली आहे.




