पिंपरी (प्रतिनिधी) पिंपरी-चिंचवड शहरातील कचऱ्यासाठी मोशी कचरा डेपोची जागा आधीच अपुरी ठरत असतानाच महापालिका प्रशासनाने शहरा लगतच्या देहूरोड आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड हटीतील कचराही मोशीतील कचरा डेपोत टाकण्यास परवानगी दिल्याने आता या दोन्ही ठिकाणचा कचरा मोशी डेपोत टाकण्यास सुरुवात झाली आहे. एकीकडे पुनावळेतील कचरा डेपोच्या जागेचे भिजत घोंगडे असताना प्रतिदिन मोशीत ३० टन कचन्याची भर पडली आहे.
पिंपरी-चिंचवड शहर चारही बाजूने मोठ्या झपाट्याने विकसित होत असून टोलेजंग गृहप्रकल्प उभारले जात आहेत. तसेच शहराची लोकसंख्याही दिवसेंदिवस वाढत असल्याने महापालिका प्रशासनाची नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविताना सातत्याने वाढत असून सध्या प्रतिदिन १२०० टन कचरा निर्माण होत आहे.
त्यामुळे मोशीतील कचरा डेपोची क्षमताही संपू लागली आहे. मात्र, कचरा डेपोसाठी पुनावळेतील जागा ताब्यात घेण्याबाबत महापालिका प्रशासन उदासीन दिसत आहे. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हदीतून गोळा केला जाणारा कचरा निगडी सेक्टर २२ खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड हदीतून गोळा केला जाणारा कचरा संत तुकारामनगर येथील लष्कराच्या मोकळ्या जागेत टाकला जात होता. विनाप्रक्रिया टाकल्या जाणाऱ्या या कचन्यास वारंवार आग लागण्याच्या घटना पडत होत्या. तसेच कचऱ्याची दुर्गंधी आणि धूर यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता, परिसरातील नागरिकांना अस्थमा, दमा यासारखे श्वसनाचे विकार होत असल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांनी वेळोवेळी महापालिका प्रशासनाकडे केली होती. या गंभीर प्रश्नाबाबत महापालिका आयुक्त आणि देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्याधिकारी यांची २ जून २०१२ रोजी बैठक पार पडली. या बैठकीत तात्पुरती उपाययोजना म्हणून देहूरोडमधील १७ ते १८ टन | खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड हदीतील १० ते १२ असा प्रति दिन गोळा होणारा अंदाजे ३० मेट्रीक टन कचरा पुढील पर्यायी व्यवस्था होईपर्यंत मोशी कचरा डेपोत स्वीकारण्याची विनंती दोन्ही कॅन्टोन्मेंट बोर्डानी पालिकेकडे केली.
देहूरोड व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड हदीतील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची यंत्रणा त्यांच्याकडे उपलब्ध नाही. हा कचरा पिंपरी-चिंचवड शहरात व लगत टाकला जात असल्याने त्याची पर्यायी व्यवस्था होईपर्यंत देहूरोड व खडकी कॅन्टोन्मेंट बोडांच्यावतीने त्यांचा गोळा होणारा सुका कचरा स्वखचनि वाहतूक करून मोशीतील कचरा डेपोत आणला जात आहे. या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेस येणाऱ्या खर्चाच्या प्रमाणात प्रतिटन ५०४ रुपये शुल्क दोन्ही कॅन्टोन्मेंट बोर्ड महापालिकेला देणार आहे.
देहूरोड व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील कच-याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची यंत्रणा त्यांच्याकडे उपलब्ध नाही. यंत्रणा उपलब्ध नसल्याने शासनाच्या आदेशाप्रमाणे दोन्ही बोर्ड परिसरातील सुमारे ३० टन सुका कचरा मोशीतील कचरा डेपोत टाकण्यास सुरुवात केली आहे. संजय कुलकर्णी, सह शहर अभियंता पर्यावरण विभाग



