पिंपरी : पत्नीच्या संमतीशिवाय दुसरा विवाह केला. तसेच विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पती आणि सासू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २६ मे २०११ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत नालासोपारा ईस्ट, पालघर येथे घडला असून विवाहितेने माहेरी आल्यानंतर याप्रकरणी १४ डिसेंबर २०२२ रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
करण हसमुख मोदी (वय ३६) आणि त्याची आई (वय ६०) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी विवाहितेच्या रंग आणि तब्बेतीवरून पतीने तिची निंदा केली. विवाहिता आणि तिच्या मुलीचा कोणताही खर्च करता जबाबदारी घेतली नाही. विवाहितेच्या संमतीशिवाय पतीने एका महिलेसोबत विवाह केला.
फिर्यादी विवाहितेचे मंगळसूत्र, बांगड्या, नेकलेस काढून घेतले. ती गरोदर असताना तिच्याकडून घरातील सर्व कामे करून घेतली. तुला मुलगाच व्हायला पाहिजे, असा सासूने तगादा लावला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.




