भोर : पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितीची रंगीत तालीम म्हणून ओळखले जाणारे ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा सध्या जिल्ह्यात पंचायत निवडणुकीच्या निमित्ताने उडत आहे. भोर तालुक्यातील करंदी खे बा, गावात ग्रामपंचायत निवडणूक उच्चशिक्षित तरुण मैदानात उतरल्यामुळे निवडणूक आणखीन रंगतदार होताना दिसत आहे.

भोर तालक्यातील करंदी (खे बा,) गावातील जनतेतून निवडून येण्यासाठी थेट सरपंच पदाचे उमेदवार नितीन नारायण बोरगे यांनी ग्रामपंचायत इलेक्शनसाठी थेट नोकरीचा राजीनामा दिला आहे. नितीन बोरगे हे उच्चशिक्षित असून ते पुण्यातील मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये चीफ आर्किटेक्ट म्हणुन कार्यरत होते. सामाजिक कामात आवड असणारे बोरगे यांनी स्वखर्चाने गावातील विविध उपाययोजना केल्या आहेत. गावातील मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी वाचनालय सुरू केले याबरोबरच शाळा, पाणी, रस्ते, ग्राम विकासाची कामे केली आहेत.

गावांत ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये बोरगे यांच्या नोकरीचा मुद्दा प्रचाराचा आला. तो गावासाठी टाइम देईल का? गावातील कामे करील का? माझी नोकरी प्रचाराचा मुद्दा होऊ नये म्हणून ग्रामपंचायत इलेक्शन विकासाच्या नावाखाली व्हायला हवी म्हणून नितीन बोरगे यांनी लाखो रुपयांचा नोकरीवर लाथ मारून पूर्ण वेळ समाजकारण करण्यासाठी आणि गावाच्या विकासासाठी स्वतःला समर्पित केले आहे.
लाखो रुपयांची नोकरी सोडून समाजकार्य पूर्ण वेळ देण्याच्या निर्णय घेतला आहे. समाजातील सर्व स्तरातील ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. आपल्या गावाला उच्चशिक्षित सुसंस्कृत विकासाची दृष्टी असलेले भावी सरपंच मिळेल असी अपेक्षा बोरगे यांनी महाराष्ट्र माझा यांच्या प्रतिनिधीशी व्यक्त केली आहे.
ग्रामपंचायत करंदी (खे. बा) सार्वत्रिक निवडणूक : २०२२
करंदी ग्रामविकास पॅनलचे अधिकृत उमेदवार
सरपंच पदाचे उमेदवार नितीन नारायण बोरगे हे आहेत.
वार्ड क्रमांक – १ चे अधिकृत उमेदवार
सदस्य पदाचे उमेदवार
१) श्री.शहाजी दिलीप बोरगे
२) सौ. गीतांजली अभिमन्यू खाटपे
३) सौ. अलका रामदास तळेकर
वार्ड क्रमांक – २ चे अधिकृत उमेदवार
१) श्री. पांडुरंग दशरथ सणस
२) श्री. कमलाकर पांडुरंग बोरगे
३) सौ.सुप्रिया उत्तम बोरगे




