कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्ग व सातारा पोलिस विभागाकडील जागा राज्य उत्पादन शुल्क विभागास हस्तांतरणाबाबत पालकमंत्री श्री. देसाई यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे आढावा घेतला. कराड- चिपळूण राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरु करा. ज्या ठिकाणी काम करणे शक्य आहे तेथील काम आठ दिवसात पूर्ण करावे अशा सूचना राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.
यावेळी दूरदृष्यप्रणालीद्वारे महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव नितिन करीर, गृह विभागाचे प्रधान सचिव संजय सक्सेना, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रधानसचिव मिलिंद म्हैसकर, राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, पोलिस अधिक्षक समीर शेख, अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे, राष्ट्रीय महामार्ग प्रादेशिक विभाग मुंबईचे मुख्य अभियंता संतोष शेलार, राष्ट्रीय महामार्ग विभाग पुणेचे कार्यकारी अभियंता धनजंय देशपांडे, एल ॲण्ड टी कंपनीचे परेश वारुळे, रविंद्र मोहिते आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.



