
काही दिवसांपूर्वी राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबद्दल एक वक्तव्य केलं होतं. महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भीक मागून शाळा सुरु केल्या होत्या, असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याचा आता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी समाचार घेतला आहे.
- चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते ?
औरंगाबादमधील पैठणमध्ये एका कार्यक्रमात शाळांच्या अनुदानाबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “सरकारवर अवलंबून का राहताय? या देशात कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले यांनी शाळा सुरु केल्या आहेत. या सगळ्यांनी शाळा सुरु करताना सरकारने त्यांना अनुदान दिलं नाही. त्यांनी लोकांकडे भीक मागितली, शाळा चालू केली मला पैसे द्या. आता त्याकाळी १० रुपये देणारे होते. आता १०-१० कोटी रुपये देणारे लोक आहेत ना?”, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं



