मुंबई : उर्फी जावेदची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. सोशल मीडियावर उर्फीच्या नावाची चर्चा रोजचं होत असते. ‘बिग बॉस ओटीटी’मधून ती प्रकाशझोतात आलेली उर्फी आपल्या बोल्ड फॅशन सेन्समुळेच नेहमीच प्रकाशझोतात असते. यातच आता उर्फी आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यात तोकड्या कपड्यावरुन नवीन वाद सुरू झाला आहे.
Can’t wait to be best friends with @ChitraKWagh after I join bjp . Remember Sanjay Chitra ji ? Aapke bjp join karne k baad Aapki toh badi dosti ho gyi thi k aap unki Saari galtiya bhool gyi thi jiske liye ncp me itna halla kiya tha!
— Uorfi (@uorfi_) January 3, 2023
अनेकदा सार्वजनिक ठिकाणी बोल्ड कपडे घालून आल्यामुळे उर्फी जावेदवर टीका होत असते. यातच भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदवर सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता पसरवल्याचा आरोप करत उर्फीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तेव्हापासून उर्फी आणि चित्रा वाघ यांच्यात सोशल मीडिया वॉर सुरू झाला आहे.



