रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत खा. शरद पवार यांनी ५० वर्षांचे योगदान दिल्याबद्दल अभीष्टचिंतन व कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन जि. प. च्या यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय सभागृहात करण्यात आले होते. कार्यक्रमास आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, खा. श्रीनिवास पाटील, आ. दिलीप वळसे-पाटील, रामशेठ ठाकूर, आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, आ. बाळासाहेब सातारा पाटील, डॉ. अनिल पाटील, सिम्बॉयसिस सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. शां. ब. मुजुमदार, सुभाषराव शिंदे प्रमुख उपस्थित होते.
खा. शरद पवार म्हणाले, रयत शिक्षण संस्थेतील माझ्या सुवर्ण महोत्सवी सक्रिय कार्यकालानिमित्त रयत शिक्षण संस्था, सातारा तर्फे अत्यंत हृदय अशा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. रयत शिक्षण संस्था हे माझे कुटुंब आहे. त्यांनी केलेल्या या सन्मानाचा मी विनम्रतापूर्वक स्वीकार करतो.
कर्मवीरांना हे दालन उभे केले त्यावेळची स्थिती शिक्षित का अशिक्षित अशी होती. यासाठी संपूर्ण आयुष्य अण्णांनी दिले आणि रयतेच्या माध्यमातून समजात बदल कसा होईल याची काळजी त्यांनी घेतली. आज तिच अण्णांची विचार वैचारिक दृष्टी नजरेसमोर ठेवून ज्ञानसंपादन करण्यासाठी तसे धोरण करायला हवे. विज्ञानाशी संबंधित असलेले ज्ञान, विज्ञानावर आधारित असलेला विचार हे आज अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे रयतच्या माध्यमातून अशापद्धतीचे वळण घेऊन पुढे जायचे आहे. यात संपूर्ण रयतची टीम म्हणजेच प्रध्यापक, विद्यार्थी, सेवक, तसेच रयतसंबंधी आस्था असलेला पाठीराखा या सगळ्यांना या नव्या विचार, नव्या दृष्टीकडे वळवायचे आहे. त्यामार्गाने पुढची पावले टाकायची आहेत. रयतचे वैशिष्ट्य आहे की गावोगावी संस्थेच्या शाखेसाठी पडेल ते कष्ट करायला हवे ते द्यायला फार मोठा वर्ग राज्याच्या कानाकोपऱ्यात आहे.



