
शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी आज ( ५ जानेवारी ) गुरुवारी अंधेरी पूर्व येथील गुंदवली शाळेतील ज्युनियर-सिनियर केजीच्या वर्गाच्या नूतनीकरणाचं उद्घाटन केलं. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवला. महापालिका, विधानसभेच्या निवडणुका घेण्याची हिंमत यांच्यात नाही, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं.
“नवीन वर्षात तरी या गद्दार सरकारने ४० आमदारांच्या आणि १३ खासदारांच्या जागी निवडणुका घेण्याची हिंमत दाखवावी. बेकायदेशीर मुख्यमंत्री स्वतःच्या कामासाठी दिल्लीत जातात, गुवाहाटीला जातात, पण राज्यासाठी कधी गेले नाहीत. आपल्याकडे एक सीएम आणि दुसरे सुपर सीएम आहेत,” असा खोचक टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.



