- पंढरपूरच्या विठुरायाच्या चरणी खोटे दागने अर्पण
- मंदिर प्रशासनाने सांगितले या मागचे कारण.
- विठुरायाच्या चरणी एकूण ३१ किलो सोने, १०५० किलो चांदी अर्पण.
पंढरपूरच्या विठुरायाकडे ३१ किलो सोने आणि १ हजार ५० किलो चांदी जमा झाली आहे. आता या दागिंन्यापासून विटा करण्यात येणार आहेत. दरवर्षी विठ्ठलाच्या खजिन्यात साधारण ३ किलो सोने आणि २०० किलो चांदीची वाढ होते. मात्र, हे दागिने अर्पण करणाऱ्या भाविकांची दागिने खरेदी करताना होणारी फसवणूक टाळणे गरजेचे असून भाविकांनी देखील सराफाकडून खरेदीनंतर पावती घेणे आवश्यक आहे, असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे.
मुंबईतील एका विठ्ठलभक्ताने आपल्या पतीची अंतिम इच्छा पूर्ण व्हावी यासाठी विठ्ठल मंदिरात एक कोटी रुपयांचे गुप्तदान अर्पण केले होते. विठ्ठल मंदिरात झालेल्या दानाच्या इतिहासात हे आतापर्यंतचे सर्वात मोठे दान आहे. या दानशूर विठ्ठलभक्ताच्या पतीचे करोनाकाळात जून २०२१ मध्ये निधन झाले होते. आपल्या निधनानंतर आपल्या विमा कंपनीकडून येणारी रक्कम विठ्ठल मंदिरात दान द्यावी अशी अंतिम इच्छा पतीने आपल्या कुटुंबीयांना बोलून दाखवली होती. ही इ्च्छा व्यक्त केल्यानंतर काही दिवसांतच त्यांचे निधन झाले होते. म्हणून त्यांच्या विम्याची रक्कम विठुरायाच्या चरणी दान करण्यात आली.



