या तीर्थक्षेत्र आळंदी येथे धर्मपरिवर्तनाचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उद्धव कांबळे (वय 48, पद्मावती रोड, आळंदी) यांनी फिर्याद दिली असून सुधाकर बाबुराव सुर्यवंशी व त्याचे दोन साथीदार (रा. धानोरी, मुंजाबावस्ती, पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार (दि. 1) सायंकाळी 7 वाजताचे सुमारास पद्मावती रोड येथे सूर्यवंशी आणि त्याच्या साथीदाराने फिर्यादी यांसह त्यांचे समाजातील इतरांना अंधश्रद्धा पसरवून त्यांचा धर्म सोडून ख्रिश्चन धर्मात येण्यास सांगून त्यांना लाल रंगाचे द्रव्य देऊन धर्मपरिवर्तनाचा प्रकार घडला. कलम 153 अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी अधिक तपास आळंदी पोलीस करत आहेत.




