मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे व खासदार संजय राऊत यांच्यामध्ये वाद भेटण्याची चिन्हे निर्माण झाले आहेत. संजय राऊतांविरोधात आपण तक्रार दाखल करणार असल्याचा नारायण राणेंनी इशारा दिल्यानंतर, संजय राऊतांनीही राणेंविरोधात आक्रमक भूमिका घेत प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना थेट एकेरी भाषेतच त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ या दैनिकातील अग्रलेखावरून राणेंनी संजय राऊतांना इशारा दिला आहे. त्याला संजय राऊतांनी उत्तर दिले आहे.
या पार्श्वभूमीवर संजय राऊत प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले, “पादरा पावटा आहे तो बाळासाहेबांच्या भाषेत, पादरा माणूस आहे. आतापर्यंत मी त्याच्याविषयी काही बोललो नाही, हा सगळ्यांना अरे तुरे करतो हा कोण आहे? मुख्यमंत्र्यांना अरे तुरे, कालपर्यंत एकनाथ शिंदेना अरे तुरे करत होता. जुने व्हिडीओ काढा त्यात मोदींनाही अरे तुरे. हे कोण आहेत, यांची चौकशी करा. आता मी करणार, आता मी काढतो. कालपर्यंतमी संयमाने वागलो, इतके वर्षे मी. पण तुम्ही जर रोज आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आम्ही सगळे, फडणवीस, अशोक चव्हाण, अहमद पटेल, सोनिया गांधी, मोदी सगळ्यांवरती अरे तुरे, अरे तुरे कोण तुम्ही? डरपोक लोक आहात तुम्ही. तुम्ही पळून गेलात तुमच्या किरीट सोमय्यांनी तुमच्यावर जे आरोप केलेत, त्यावर उत्तर दिलं का तुम्ही? कुठंय किरीट सोमय्या आता? तुमच्या १०० बोगस कंपन्या आणि इतर सगळं बाहेर काढतो आता मी.” याशिवाय, “कोणत्या अग्रलेखाबद्दल म्हणताय तुम्ही? वाचा नीट. परत सांगतो नारायण राणे माझ्या नादाला लागू नकोस. झालं आता मी कालपर्यंत गप्प होतो आज तू मर्यादा सोडली आहेस. तुझ्यासारखे आले ५६ आणि गेले. नामर्द माणूस आहेस तू ईडी आणि सीबीआयच्या भीतीने पळून गेलास. तू आम्हाला लढायच्या गोष्टी काय सांगोतस. तुझी लायकी आहे का?” असंही संजय राऊत म्हणाले.



