पिंपरी (प्रतिनिधी) मागील काही वर्षापासून पिंपरी चिंचवड शहरात सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याचे काम सुरू आहे. यावरती महापालिकेकडून कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले आहे. आता महापालिकेच्या प्राथमिक शाळेच्या इमारतीमध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी निधीची कमतरता भासत आहे. त्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाच्या २०२२- २३ च्या महसुली अंदाजपत्रकातील सीसीटिव्ही कॅमेरे या लेखाशिर्षावरील ५० लाख रुपये नवीन उपलेखाशीर्ष तयार करून त्यावर वर्ग करण्याची शिफारस अणुविद्युत व विभागाने केली आहे. दूरसंचार
महापालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत १०५ प्राथमिक आणि १६ माध्यमिक शाळा चालवल्या जातात. ८८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सीसीटीव्ही यंत्रणेची देखभाल दुरुस्ती करण्याच्या कामाच्या अंतिम बिलापोटी रक्कम देणे अनिवार्य आहे. या कामासाठी अणुविद्युत व दूरसंचार विभागाकडे निधीची कमतरता भासत आहे. त्यामुळे २०२२-२३ या कालावधीत निधी उपलब्ध करण्यासाठी प्राथमिक विभागाच्या सीसीटिव्ही कॅमेरे या लेखाशीर्षावरील ५० लाख रुपये अणुविद्युत व दूरसंचार विभागाच्या अदाजपत्रकात नवीन उपलेखाशीर्ष तयार करून त्यावर वर्ग करण्यासाठी या विभागाने शिफारस केली आहे.
सीसीटीव्ही यंत्रणा देखभाल दुरुस्तीचे काम मे. भारतीय राष्ट्रीय उपभोक्ता सहकारी संघ मर्यादित त्या संस्थेला देण्यात आले आहे. ८८ शाळांमधील सीसीटीव्ही यंत्रणा उभारणे, पुरवठा केल्यानंतर त्याची देखभाल दुरुस्ती करण्याचे कामही त्यांनाच देण्यात आले. त्यांना ४ वर्षांसाठी हे काम देण्यात आले आहे.
त्याच्या ९ ऑगस्ट २०२२ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीसाठी अंतिम विलापोटी रक्कम देणे अपेक्षित आहे. त्यासाठी पैशांची उपलब्धता नसल्यामुळे प्राथमिक विभागाकडील सीसीटीव्ही कॅमेरे या लेखाशीर्षावरील ५० लाख रुपये वर्ग करण्याची अपेक्षा अणुविद्युत व दूरसंचार विभागाला लागली आहे. त्याची शिफारसही त्यांनी स्थायी समितीकडे केली आहे.



