पिंपरी : सध्या डिजिटलच्या युगात लहान मुलापासून आभार वृध्द पर्यंत सर्वच मोबाईलमध्ये खेळ खेळण्याचा आनंद लुटतात. मात्र खेळाची खरी मजा मातीत खेळण्यांमध्ये असते ज्यांनी हे लहानपणी अनुभवले त्यांनाच याची खरी पारख आहे. सध्या मोबाईलच्या जगात लहान मुलांचे बालपण हरवलेले आहे. सुमारे दीड दशकापूर्वी ‘चला खेळू भोवरा, लगोरी, जिभल्या, विटी-दांडू, गोट्या’ हे परवलीचे शब्द लहान मुलांच्या तोंडी हमखास असत. आजच्या पिढीतील अनेक प्रौढांचे बालपण या खेळांमुळे समृद्ध झाले. परंतू मोबाईलमध्ये आताच्या मुलांचे लहानपण हरवत चालले आहे.
अशा आभासी दुनियेत जगणाऱ्या लहान मुलांसाठी पूर्णानगर वॉकर ग्रुप व पूर्णानगर विकास समिती यांनी सॉईल गेम्स म्हणजेच मातीतील खेळाचे आयोजन पुर्णानगर चिंचवड येथील पंडीत दीनदयाळ उपाध्याय क्रीडासंकुलमध्ये केले आहे. या आठवणीतील मैदानी खेळ आयोजन आपण करत आहोत.
1) गोट्या
2) भवरा
3) विटटी दांडू
4) लिंगोरचा
5) रसी खेच
6) मामाच पञ
7) पोत्यातील उडया
8) टायर चालवीणे
9) थाळी फेक
10) दोरीचा उडया व एकना अशा अनेक जुन्या प्रकारच्या खेळाचे आयोजन करण्यात येत आहे. हे रविवार दिनांक २९ जानेवारी सकाळी ८ ते ११ यावेळेत याचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे मोबाईल पासून दूर नवीन पिढीला मातीतील खेळांची स्पर्धेचा आनंद लुटण्याचा अनुभव उपक्रम घेता येणार असे युवानेते विकास गर्ग यांनी सांगितले आहे. पूर्णानगर येथील मैदानावर मातीमधील खेळांचीl परिसरातील नागरिकांना उत्सुकता लागली आहे.



