पिंपरी : जनतेशी थेट संपर्क आणि विविध उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जोपासणारा नेता आणि तगडा अनुभव अशी ओळख असलेले ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत नखाते यांची भाजप प्रदेश कार्यकारणी मध्ये निमंत्रित सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. त्यांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
https://maharashtramaza.online/?p=162938
भाजपचे रहाटणीतील मुख्य चेहरा असणारे माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते यांना मानणारा मोठा वर्ग रहाटणी परिसरात आहे. गेल्या ३० वर्षांचा राजकीय प्रदीर्घ अनुभव असणारे चिंचवड विधानसभेतील भाजपचे चंद्रकांत नखाते हे एकमेव नगरसेवक आहेत. तसेच ते दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे निकटवर्तीय मानले जातात.




