आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर येथे पोट निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. या जागेवर कोणता पक्ष कोणाला उमेदवारी देत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातच विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी या जागेसाठी लक्ष्मण जगताप यांचा भाऊ आणि पत्नीच्या नावाची चर्चा असल्याचे म्हटले आहे.
मात्र, भापजपचा उमेदवार कोण हे माहिती नाही, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे. देशात सध्या धर्मातलं अंतर वाढत चालली आहे. मात्र, कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल असे वागू नये असे पवार म्हणाले. याशिवाय महागाई आणि बेरोजगारीत प्रचंड वाढ झाली असल्याचेही पवार म्हणाले. कसब्यातून मुक्ता टिळक यांचे पती इच्छूक असल्याची चर्चा आहे. त्यामुळे येत्या काळात कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी दिली जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
चिंचवड विधानसभेसाठी राष्ट्रवादीने कंबर कसली असून कोणत्याही परिस्थितीमध्ये ही जागा लढणार असल्याचे राष्ट्रवादीचे विठ्ठल काटे यांनी सांगितले. त्यासाठी चिंचवड मधील पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी बैठक घेवून विठ्ठल काटे यांना तिकीट मिळावे यासाठी पक्ष श्रेष्ठींकडे मागणी केली जाणार आहे. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादी लढवणार आहे.या पोटनिवडणूकीत विठ्ठल काटे इच्छुक आहेत, २७ तारखेला निवडणूक असल्याने पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. आज चिंचवड पार्टी कार्यालयामध्ये पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची, नगरसेवकांची बैठक पार पडली या बैठकीत निर्णय झाला आहे की काहीही झालं तरी या जागेवर पक्षाने उमेदवार द्यावा अशी मागणी पक्ष श्रेष्ठींकडे केली जाणार आहे.




