कोल्हापूर : माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत सलग दुसऱया दिवशीही कडक पोलीस बंदोबस्तात रात्री उशिरापर्यंत ईडीच्या अधिकाऱयांकडून तपासणी सत्र सुरू राहिले. आणखी किती काळ ही तपासणी होणार असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.
ईडीचे अधिकारी काल सकाळी जिल्हा बँकेत अचानक दाखल झाले. मुख्य कार्य.अधिकाऱयांच्या कक्षात कागदपत्रांची तपासणी सुरू होती. काल रात्री बारापर्यंत ही तपासणी सुरू होती. आज पुन्हा सकाळपासून ईडीच्या अधिकाऱयांनी कागदपत्रांची पडताळणी सुरू केली.
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची खाती असलेल्या गडहिंग्लज शाखेतील कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर ते पथकही आज बॅंकेच्या मुख्य इमारतीत कारवाईसाठी दाखल झाले. दरम्यान, मुंबईहून आज आमदार हसन मुश्रीफ येथे दाखल झाले असून याबाबत त्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.



