मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ७ महिन्यात जाहिरातींसाठी शासनाच्या तिजोरीतून तब्बल ४२ कोटी ४४ लाख रुपयांची उधळपट्टी केल्याची माहिती उघड झाली आहे, अशी माहिती ही माहिती अधिकारातून उघड झाली आहे.
मुख्यमंत्र्यांनी शासनाच्या तिजोरीतून दिवसाला १९ लाख ७४ हजार रुपये खर्च केल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे, असा दावा आरटीआय कार्यकर्ते नितीन संजय यादव यांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरटीआय कार्यकर्ते नितीन संजय यादव यांनी माहिती अधिकारातून ही माहिती समोर आणली आहे . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात त्यांचे सरकार स्थापन झाल्यापासू फक्त ७ महिन्यात जाहिरातींसाठी शासनाच्या तिजोरीतून तब्बल ४२ कोटी ४४ लाख रुपये खर्च केल्याची धक्कादायक माहिती ही माहिती अधिकारातून प्राप्त झाली आहे.



