पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीसाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांना उमेदवारी दाखल केली. विरोधी पक्षनेते स्वतः अजित पवार यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरण्यात आला. यावेळी रहाटणीतील शिवाजी पुतळ्याला वंदन करून व पिंपळे सौदागर येथील शंभू महादेव मंदिरात पूजा करून हजारोंच्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते पदयात्रेला उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला तिकीट मिळाल्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या अभूतपूर्व संचारला होता. नाना काटे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघालेल्या रॅलीत पिंपरी चिंचवड शहरातील सर्व प्रमुख नेते, नगरसेवक, पदाधिकारी व युवकांचा सहभाग लक्षणीय होता. स्वतः अजितदादा उपस्थित असल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह भरलेला दिसून आला.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक असणाऱ्या पक्षातील कार्यकर्त्यालाच उमेदवारी मिळाल्यामुळे इतर सर्व इच्छुक एकजुटीने अर्ज भरण्यासाठी उपस्थित होते. महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चिंचवडमध्ये चांगले संघटन दिसून आले. पालिका सत्ताकाळात अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली प्रचंड विकास कामे झाली आहेत. सोबतच नाना काटे यांच्यासारखा तरुण तडफदार युवक चेहरा राष्ट्रवादीला आमदार म्हणून मिळणार असल्याने युवकांमध्ये उत्साह संचारला होता. यामुळे ही निवडणूक आपणच जिंकू असा आत्मविश्वास संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये दिसून आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चिंचवड विधानसभा निरीक्षक आमदार सुनिल अण्णा शेळके, आमदार अण्णा बनसोडे, आमदार सुनील टिंगरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, शिवसेना शहराध्यक्ष सचिन भोसले, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे, राष्ट्रवादी युवक कँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर, राष्ट्रवादी महिलाचे अध्यक्ष कविता आल्हाट, युवक अध्यक्ष इम्रान शेख, राष्ट्रवादी युवती अध्यक्ष वर्षा जगताप, राष्ट्रवादी विद्यार्थी अध्यक्ष यश साने, सोशल मीडिया शहराध्यक्ष समीर थोपटे, मा.महापौर प्रभाकर वाघेरे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, प्रशांत शितोळे, अतुल शितोळे, मयूर कलाटे, श्याम लांडे, पंकज भालेकर, धनंजय भालेकर, विनोद नढे, राहुल भोसले, नगरसेविका मंगलाताई कदम, उषा काळे, मायाताई बारणे, शमीमताई पठाण, संगीता ताम्हाणे, स्वाती उर्फ माई काटे, शितल काटे, माया बारणे, मा.नगरसेवक हरिभाऊ तिकोने, राजेंद्र साळुंखे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष संगीता कोकणे, मनीषा गटकळ, सारिका पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, युवक कार्यकर्ते इतर सर्व घटक पक्षातील सर्व नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




