पिंपरी : चिंचवडमध्ये भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक होत आहे. या ठिकाणी भाजपने यापूर्वीच आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून चिंचवड येथे उमेदवार जाहीर करण्यात आला. राष्ट्रवादीकडून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत काटे यांनी उमेदवारी अर्ज भरला.
अर्ज भरून बाहेर जात असतानाच अपक्ष म्हणून राहुल कलाटे हेही त्याठिकाणी कार्यकर्त्यांच्या समवेत आले. विरोधी पक्षनेते अजित पवार गाडीत बसून निघून गेल्यानंतर एकाच मिनिटात काटे व कलाटे यांच्या कार्यकर्त समोरासमोर आल्यामुळे वातावरण काही काळ तंग झाले. दोन्हीही गटाकडून नाना… दादाच्या नावांनी घोषणाबाजी करण्यात आली. उत्साही कार्यकर्त्यांनी दोन्हीही उमेदवारांना खांद्यावर घेऊन जोरदार घोषणाबाजी केली.




