पिंपरी ; महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार जाहीर झाल्यानंतर ठाकरे गटाचे बंडखोर नेते राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. मी जनतेच्या मनातील आमदार असून जनता मला निवडून निवडून देईल. अजित पवार हे मला आमदार करणार नाहीत जनता करणार आहे. त्यामुळे मी अपक्ष लढण्यावर ठाम असल्याचे ठाकरे गटाचे बंडखोर नेते राहुल कलाटे यांनी स्पष्ट केले आहे.
https://maharashtramaza.online/?p=163214
राहुल कलाटे यांनी शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करत पोटनिवडणूकीत शड्डू ठोकला आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीत भाजपाच्या अश्विनी लक्ष्मण जगताप, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नाना उर्फ विठ्ठल काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे अशी तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे.
राहुल कलाटे यांनी म्हटले की, चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे राजकीय गणित २००९ पासून पाहिल्यास या मतदारसंघात राष्ट्रवादी अपयशी ठरलेली आहे. त्याकाळात देखील दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी निवडणूक अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतला होता. पुढे ते म्हणाले की, २०१९ च्या विधानसभेत मी देखील अपक्ष लढलो होतो. तेव्हा, मोदी लाटेत कुठलाच नेता निवडणूक लढायला तयार नव्हता त्यावेळी मी निवडणूक लढली आहे. त्यामुळे मीच जनतेच्या मनातील आमदार असून जनता मला निवडून निवडून देईल असा विश्वास राहुल कलाटे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.




