पिंपरी : राज्यात नुकत्याच झालेल्या पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा विजय मिळाला आहे. आता चिंचवड विधानसभेत होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या विजयाचा वारू कायम राहणार आहे . काँग्रेस पक्षाची सर्व ताकद महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या पाठीशी उभी करून विजय खेचून आणू असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड राष्ट्रीय काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांनी बोलताना व्यक्त केले.

यावेळी चिंचवड विधानसभेचे निरीक्षक आमदार सुनील आण्णा शेळके, राष्ट्रीय काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे, माजी महापौर कविचंद भाट, भाऊसाहेब भोईर, प्रभाकर वाघेरे, गौतम दरकडे, सायली नढे, सतीश दरेकर यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाना काटे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. नाना काटे यांचा विजय करण्यासाठी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षांचे सर्व आजी माजी नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते एक दिलाने कामाला लागले आहेत. नाना काटे यांच्या प्रचारार्थ बैठकीत काँग्रेसचे शहर अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी महाविकास आघाडीचा उमेदवार प्रचंड मताने निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकतीने प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे मोठ्या संख्येने पदाधिकारी व मतदार आहेत. काँग्रेसचे सर्व कार्यकर्त्यांनी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवसापासून प्रचारास सुरुवात केली आहे. चिंचवड मतदारसंघात काँग्रेसची ताकद असलेल्या भागामध्ये नाना काटे यांना प्रचंड मताधिक्य कसे मिळेल यासाठी पदाधिकाऱ्यांची चर्चा करण्यात आली. मतदारसंघात प्रत्येक घराघरात नाना काटे यांचे घड्याळ हे चिन्ह पोहोचवण्याची व त्यांना विजयी करण्याची कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला.
याप्रसंगी प्रदेश काँग्रेस सचिव दीपक साईसर, माजी नगरसेवक विश्वास गजरमल,शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दही तुले, शहर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, महिला काँग्रेस अध्यक्ष सायली नढे, काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष वीरेंद्र गायकवाड, एन एस यु आय चे उपाध्यक्ष उमेश खंदारे, चिंचवड मतदार संघ काँग्रेसचे अध्यक्ष माऊली मलशेट्टी, पिंपरी मतदारसंघ काँग्रेसचे अध्यक्ष विश्वनाथ जगताप, भोसरी मतदारसंघ काँग्रेसचे अध्यक्ष विठ्ठल शिंदे, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सौरभ शिंदे, स्वप्निल बनसोडे, रवी नांगरे, निखिल भोईर, सचिन कोंढरे, मिलिंद बनसोडे, मागासवर्गीय विभागाचे अध्यक्ष विजय ओव्हाळ, रोजगार विभागाचे अध्यक्ष विशाल सरवदे, ग्राहक संरक्षण विभागाचे अध्यक्ष झेवियर एंथनी, इस्माईल संगम, जुबेर खान, डॉ. मनीषा ताई गरुड, प्रियंका मलशेट्टी, निर्मलाताई खैरे, भारतीताई घाग, नंदाताई तुळसे, महानंदा कसबे, संदीप शिंदे, श्याम भोसले, राजू ठोकळे, अबूबकर लांडगे, तानाजी काटे, पांडुरंग जगताप, बाबा बनसोडे, गौतम ओव्हाळ, अण्णा कसबे, उमेश बनसोडे, आण्णा पुरंदरे, इरफान शेख, फिरोज शेख आधी पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.




