पिंपरी ; पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणाला दिशा देणारा चिंचवड विधानसभेत होणाऱ्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील प्रमुख 20 स्टार प्रचारकांची यादी नुकतीच जाहीर केले आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेही मैदानात उतरणार असल्याने चिंचवडची निवडणूक रंगतदार होणार हे निश्चित झाले आहे.
चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 26 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शिवाजी गरजे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या विधानसभेत प्रचारासाठी येणाऱ्या प्रमुख 20 स्टार प्रचारक यांची यादी पाठवली आहे.
यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, राजेश टोपे, धनंजय मुंडे, शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, सुनील तटकरे, फौजीया खान, वंदना चव्हाण, आमदार एकनाथ खडसे, जितेंद्र आव्हाड, अमोल मिटकरी, निलेश लंके, चिंचवड विधानसभा प्रभारी सुनील आण्णा शेळके, महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण, अली शेख या २० स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडे देण्यात आले आहे.




