मुंढे, ता. कराड येथील चिमुकल्या सख्या बहीण-भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, धान्याची साठवणूक करत असताना त्यात टाकल्या जाणाऱ्या पावडरीच्या उग्र वासाने चिमुकल्या दोघांनाही त्रास झाल्याचे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
श्लोक अरविंद माळी व तनिष्का अरविंद माळी , दोघेही ( रा. मुंढे, ता. कराड) अशी मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, मुंढे येथील अरविंद माळी यांच्या घरात धान्य साठवून ठेवत असताना त्यामध्ये पावडरीचा वापर केला होता. त्या पावडरचा उग्र वास घरात येत असल्याचे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले आहे.



