पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या पंधराव्या फेरी अखेर भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या आघाडी कायम आहे. त्यांना ८,४८३ मतांची आघाडी कायम ठेवली आहे.
सुरुवातीपासून जगताप यांनी आघाडी ठेवत अकराव्या फेरी अखेर जगताप यांना ४९ हजार २३९ मते घेत आघाडी कायम ठेवली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना ४०,७५७ मध्ये मिळाले आहेत. तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना केवळ १४,९६४ मते मिळवत समाधान व्यक्त करावे लागत आहे.
यामध्ये अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना मिळालेले मतदान भाजपच्या पथ्यावर पडल्याचे दिसत आहे. अपक्ष राहुल कलाटे यांना मिळणाऱ्या मतामुळे महाविकास आघाडीचे नाना काटे यांच्या मतांच्या आकडेवारीत काटे पसरत असल्याचे दिसून येते. चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप यांच्या मताची आकडेवारी पाहता त्यांच्या विरोधात असणाऱ्या मतांची बेरीज अधिक आहे. त्यामुळे यापुढील निवडणुकीत जगताप यांना ही धोक्याची घंटा दिसत आहे. शिवसेनेचे नगरसेवक राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. कलाटेंची समजूत काढण्याचा प्रयत्न निष्फळ ठरल्याने पहिल्या दिवसापासून महाविकास आघाडीची चिंता वाढली होती ती आता निकालातून स्पष्ट होताना दिसत आहे.




