पिंपरी : चिंचवड व कसबा निवडणुकीत महाविकास आघाडीने सत्ताधारी भाजपला कडवी झुंज दिली. यात कसब्यात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना धूळ चारत विजय मिळवला तर चिंचवड मतदारसंघात भाजपच्या अश्विनी जगताप यांचा बालेकिल्ला असणाऱ्या पिंपळे गुरव सांगवी परिसरातील मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर त्यांच्या मतांच्या आघाडीत वाढ झाले आहे. त्यांना २८ वी फेरी अखेर २३,३०७ आघाडी कायम ठेवली आहे.
नाना काटे आणि राहुल कलाटे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या पिंपळे सौदागर, वाकड, रहाटणी परिसरातील मतदान मोजणी पूर्ण झाली आहे. याठिकाणी जगताप यांनी आपली आघाडी कायम ठेवली होती. आता २८ व्या फेरीत सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव या भागातील मतमोजणीला सुरुवात झाली. त्यावेळी १० हजाराचे आघाडीवर असणारे जगताप यांनी थेट २३,३०७ मतांची आघाडी घेतली आहे.
अश्विनी जगताप यांना २८ व्या फेरी अखेर १,०५,१३८ मते घेत आघाडी कायम ठेवली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना ८१,८३१ मध्ये मिळाली आहेत. तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना केवळ ३२,१७८ मते मिळवत समाधान व्यक्त करावे लागत आहे.
यामध्ये अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना मिळालेले मतदान भाजपच्या पथ्यावर पडल्याचे दिसत आहे. अपक्ष राहुल कलाटे यांना मिळणाऱ्या ३२,१७८ मतामुळे महाविकास आघाडीचे नाना काटे यांच्या मतांच्या आकडेवारी मागे पडताना दिसून येते. चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप यांची कायम आघाडीवर दिसून येत आहेत आता त्याची विजयाच्या उंबरठ्यावर येऊन पोहचल्या आहेत.




