कराड : पुणे-बेंगळुरु महामार्गावर कराडजवळ ट्रॅफिक जाम वाहनांच्या लांबच लाब रांगा लागल्या आहेत. गेल्या 3 तासांहून अधिक काळ वाहतूक खोळंबली असल्याने प्रवासी आणि वाहनचालक चांगलेच संतापले आहेत. कराड जवळ महामार्गावर वाहनांच्या 10 किलोमीटरहून अधिक लांब रांगा लागलेल्या आहेत. आज परीक्षार्थी विद्यार्थ्यांना या ट्रॅफिक जामचा मोठा फटका बसणार आहे.
पुणे-बेंगळुरु आशियाई महामार्गावर कराड येथील कृष्णा हॉस्पिटल समोरील उड्डाणपूल पाडण्यासाठी पुलावरून वाहतूक व्यवस्था वळविण्यात आल्याने कराड शहरात जोडणाऱ्या सर्व सेवा रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प होऊन कोलमडून गेली. यामुळं महामार्गावर दोन्ही दिशेला सुमारे दहा किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
या वाहतूक कोंडीचा फटका प्रवाशांना बसला आहे. गेली महिनाभरापासून कराड येथील मुख्य प्रवेशद्वारासमोरील उड्डाणपूल पाडण्याचं काम वेगात सुरू असून पुल पाडण्याचं काम पूर्णत्वास आलं आहे. कृष्णा हॉस्पिटल समोरील पूल पाडण्याच्या कामास सुरुवात करण्यात येणार असल्याने आज पासून या पुलावरून सर्व वाहतूक बंद करण्यात आली होती.



