मुंबई : राज्य सरकारने अर्थसंकल्प सादर करताना महाराष्ट्रात भाजपला बळ देणाऱया गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचे काय झाले? हे स्मारक व्हावे यासाठी मी मंत्री असताना संभाजीनगरमध्ये एका डेअरीमधील जागा निश्चित केली होती.
तिथे स्मारक करायचे ठरवले गेले, मात्र नंतर त्याचे काय झाले? हा पक्ष मारवाडी-बामणांचा असताना मुंडे यांनी हा पक्ष बहुजन समाजाचा करण्यासाठी योगदान दिले, मात्र मुंडे यांच्या स्मारकाचा सरकारला विसर पडला आहे. त्या गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचे काय झाले, असा प्रश्न राष्ट्रवादीचे गटनेते एकनाथ खडसे यांनी अर्थसंकल्पाच्या चर्चेत सरकारला विचारला.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज, वीरमाता जिजामाता यांच्या स्मारकाचे काय झाले? जिजाऊसृष्टीचा उल्लेखही अर्थसंकल्पात नाही, असा सवालही सरकारला विचारला. अर्थसंकल्पावरील चर्चे दरम्यान खडसे बोलत होते.



