पिंपरी : पिंपरी चिंचवड परिसरामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने चाकरमान्यांची धावपळ उडाली. शाळा सुटण्याच्या सुमारास व कामावरून सुटण्याच्या वेळेत पाऊस सुरू झाल्याने नोकरदारासह शालेय विद्यार्थ्यांना आपले घर काढताना कसरत करावी लागली. तर दिवसा अंधार पडल्याने सायंकाळी वाहनांना लाईट चालू करून प्रवास करावा लागला.

पिंपरी चिंचवड शहर व उपनगरातील परिसरात संध्याकाळी जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाल्याने नागरिकांची एकच धावपळ उडाली मोठ्या प्रमाणात वाऱ्यासह विजेचा कडकडाट होत जोरदार पाऊस झाला यामुळे शहरातील काही सकल भागात पाणी साचले होते. अचानक हजेरी लावलेल्या अवकाळी पावसाने लोणावळेकरांना चांगलेच झोडपून काढले. जोरदार वाऱ्यासह अचानक आलेल्या पावसात भिजण्यासाठी मुलांना मोह आवरला नाही. त्यांनी मनसोक्त पाण्यात उड्या घेत पावसाचा आनंद घेतला.




