लोणावळा : धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगतीमार्गावर किलोमीटर 82.00 दरम्यान, उर्से टोलनाक्याजवळ आढे गावाच्या हद्दीत आज (शुक्रवार, 17 मार्च) एक भीषण अपघात घडला आहे. एका मालवाहतूक ट्रकला भरधाव कारने पाठीमागून धडक दिली. यात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
माहितीनुसार मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघालेली कार क्रमांक एम.एच. 04 जे.एम. 5349 ही किलोमीटर 82.00 च्या दरम्यान समोरच्या ट्रक क्रमांक आर.जे. 09 जी.बी. 3638 याला मागून जोरदार धडकली. ही धडक एवढी भीषण होती की त्यातील चालकासह दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे.
आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, लोकमान्य हॉस्पिटलची यंत्रणा, पवना हॉस्पिटलची राणी अॅम्बुलन्स या अपघातात मदत कार्य करत होते. महामार्ग पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली यातील वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.




