तळेगाव स्टेशन (वार्ताहर) पैसाफंड प्राथमिक शाळेत चौथीच्या विद्यार्थ्यांचे कब बुलबुल शिबीर दिनांक १४ मार्च रोजी उत्साहात पार पडले .सकाळी ध्वजारोहण करून कब बुलबुल शिबिरास सुरुवात झाली. संस्थेचे सचिव संतोष खांडगे, नवीन समर्थ विद्यालयाचे शालेय समिती अध्यक्ष महेश भाई शहा , पैसाफंड शाळेचे शालेय समिती अध्यक्ष विनायक अभ्यंकर, शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता लादे , बालवाडी विभाग प्रमुख मनीषा निऱ्हाळी यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन व प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
संतोष खांडगे यांनी उपस्थित सर्व कब व बुलबुल पथकातील शिशुवीर व बालिका यांना शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या व या शिबिरातून प्रेरणा घेऊन भविष्यामध्ये आपल्या भारत देशाचे रक्षण करण्याची जबाबदारी तुमच्याकडे आहे असे सांगून संरक्षणाच्या विविध क्षेत्रामध्ये आपल भवितव्य घडवा असा संदेश विद्यार्थ्यांना दिला. यावेळेस विद्यार्थ्यांनी दोरीवरून झाडावर चढणे ,शिडी वर चढणे, रोपच्या साह्याने पलीकडे जाणे इत्यादी साहसी प्रात्यक्षिके करून दाखविली. कराटे प्रशिक्षक संदीप कुंजीर यांनी विद्यार्थ्यांना आत्मसंरक्षणाचे धडे दिले.
स्काऊट गाईडचेचे प्रशिक्षक विशाल मोरे तसेच पल्लवी जगताप यांनी विद्यार्थ्यांकडून विविध प्रात्यक्षिके करून घेतली . भारत स्काऊट गाईडचे राज्यस्तरीय तज्ञ मार्गदर्शक विजय जोरी सर यांनी विद्यार्थ्यांना प्रथमोपचार विषयक प्रशिक्षण दिले व स्काऊट बद्दल माहिती दिली. वन्यजीव रक्षक संस्था मावळ यांच्याकडून विद्यार्थ्यांना सर्पां विषयी माहिती देण्यात आली . यावेळेस विद्यार्थ्यांनी दुपारी स्नेहभोजनाचा आनंद लुटला. शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी भोजन बनवले. शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता लादे, शालेय समिती अध्यक्ष विनायक अभ्यंकर कब बुलबुल पथकाच्या प्रमुख पल्लवी जगताप व सहशिक्षिका वैशाली मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर संपन्न झाले.




