तळवडे ; देहू-आळंदी रोडवरती तळवडे गावच्या हद्दीत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ऐतिहासिक महाप्रवेशद्वार कामास शुभारंभ करण्यात येत आहे. तळवडे येथील मा. नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर यांच्या संकल्पनेतून व विशेष पाठपुराव्याने देहू आळंदी रस्त्यावर तळवडे प्रभाग क्र.1 मनपा हद्दीत उभारण्यात येणाऱ्या ऐतिहासिक जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज महाप्रवेशद्वाराच्या कामास शुभारंभ करण्यात आला आहे. भालेकर यांच्या पाठपुराव्याला यश आल्याचे दिसून येत आहे.

प्रभाग क्रमांक १२ चे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक पंकज भालेकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याला यश मिळाल्याने नागरिक वर्गात समाधान व्यक्त केले आहे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज व संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या देहू आळंदी बीआरटीएस रस्त्यावरती भव्य प्रवेशद्वार कमान उभारण्यासाठी २८ डिसेंबर २०२० रोजी नगरसेवक पंकज भालेकर यांनी आयुक्तांना निवेदनाद्वारे मागणी केली होती. यावर ९ जानेवारी २०२१ रोजी ६ कोटीपैकी १ कोटीची अंदाज पत्रकातील तरतूद प्रशासकीय मान्यता मिळाली. यावर २४ जून २०२१ रोजी पालिकेचे कार्यकारी अभियंता यांनी नगरसेवक पंकज भालेकर यांच्या पत्राचा संदर्भ घेत कामाची निविदा कार्यवाही करण्यासाठी कामाचे अंदाजपत्रक व आराखडे तयार करण्याबाबत आयुक्तांच्या मान्यतेनंतर निविदा प्रसिद्ध केली. महाराष्ट्र शासन संकीर्ण २०१८/प्र. क्र.५४/नावि-१६ अन्वये निविदा स्वीकृत रकमेची निविदा पूर्व व निविदा पश्चात मान्यता देत स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्याचा आज प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ होत आहे.
जगतगुरु तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांनी महाराष्ट्रासह संपूर्ण जगाला शांती समता बंधुता व सर्वधर्मसमभाव हा मूलमंत्र दिला आहे. या दोन महान संतांचे जन्मभूमी व तपोभूमी तीर्थक्षेत्रांना जोडणारा देहू आळंदी बीआरटीरोड पिंपरी चिंचवड महानगरपालिका कडुन विकसित करण्यात आला आहे. या रोडवर महाराष्ट्र व जगभरातून अनेक भाविक येत असतात. या रोडवर भाविकांची वर्षभर ये-जा सुरू असते. याकरिता महापालिकेच्या हद्दीत भव्य महाप्रवेशदार व स्वागत कमान उभारण्यात यावी अशी सातत्याने मागणी पंकज भालेकर यांनी केली होती. त्याच्या या पाठपुराव्याला आज यश मिळाले आहे.




