बोर्लीपंचतन | मकरंद जाधव
छत्रपती शाहु महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था(सारथी)पुणे आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (MKCL) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम संपुर्ण महाराष्ट्रात तालुका स्तरावर राबविण्यासाठी मराठा,कुणबी,कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी समाजाच्या नॉन क्रिमिलेयर गटाच्या युवक,युवतींसाठी निशुल्क कौशल्य विकास प्रशिक्षणाला नुकताच श्रीवर्धन येथील पेशवे पाखाडीमधील MS-CIT चे अधिकृत संगणक केंद्र क्रिएटिव्ह इन्फोटेक येथे प्रारंभ झाला.
याप्रसंगी केंद्र समन्वयक कल्याणी तोडणकर यांनी निवड झालेल्या युवक युवतींचे अभिनंदन केले. सारथी या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत या समाजातील युवक,युवतींसाठी विविध उपक्रम राबवले जातात. स्वयंरोजगार क्षमता वाढविणे,त्यांच्या कौशल्याची कमतरता भरुन काढणे या उद्देशाने या उपक्रमांचे आयोजन केले आहे.विशिष्ट डिजीटल कौशल्ये आणि सॉफ्ट स्किल्स यावर प्रभुत्व मिळवून स्थानिक आणि जागतिक डिजीटल अर्थव्यवस्थेतील संधींसाठी तरुणांना या उपक्रमांमार्फत विकसित केले जाणार आहे.
या अभ्यासक्रमाचा युवक, युवतींना आगामी काळात चांगला फायदा होणार असुन पूर्णतः निशुल्क असलेले हे प्रशिक्षण मराठा,कुणबी समाजातील दहावी उत्तीर्ण असलेल्या १८ ते ४५ वयोगटातील नॉन क्रिमिलेयर गटाच्या सर्व युवक व युवतींसाठी एक सुवर्णसंधी असुन प्रशिक्षणाच्या पहिल्या बॕच मध्ये निवड झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थींनी अभ्यासक्रमाला नियमित उपस्थित राहून या सहा महिन्यांच्या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन क्रिएटिव्ह इन्फोटेकच्या केंद्र समन्वयक कल्याणी तोडणकर यांनी केले आहे.
तसेच केंद्रामधे इतर विद्यार्थ्यांसाठी MSCIT,Tally Prime,Advanced Excel या जॉब ओरिएंटेड कोर्सेससाठी देखील प्रवेश सुरु झाले असुन इच्छूकांनी श्रीवर्धन येथील पेशवे पाखाडीमधील MS-CIT चे अधिकृत संगणक प्रशिक्षण केंद्र क्रिएटिव्ह इन्फोटेक येथे भेट द्यावी अथवा 9226476400 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.



