बोर्लीपंचतन | मकरंद जाधव
श्रीवर्धन-दिघी या मार्गाचं नव्याने करण्यात येत असलेलं डांबरीकरण नुकतच पुर्ण झालं असुन वाहनांच्या वेगावर मर्यादा रहाण्यासाठी ठरावीक अंतरावर गतिरोधक बसवले आहेत.पण या गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारले नसल्याने हे गतिरोधक वाहनचालकांच्या नजरेस येत नाही. अचानक गतिरोधक समोर आल्यास चालकांचं वाहनावरचं नियंत्रण सुटून अनेकदा वेगाने येणारी वाहने गतिरोधकावर जोरात आदळतात.त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
वाहनचालक व या मार्गावरुन रहदारी करणाऱ्या नागरीकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणताही मोठा अपघात होण्याच्या आधी संबधित विभागाकडून तातडीने सर्व गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारण्यात यावेत अशी मागणी वाहनचालक व नागरीकांकडून होत आहे.



