खोपोली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात केंद्र सरकार कडून सुरू असलेली राजकीय द्वेषाची कारवाई विरोधात देशात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. खोपोलीतही राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ महाविकास आघाडीतील सर्व घटक राजकीय पक्षांच्या वतीने शुक्रवार दि.31 मार्च 2023 रोजी शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोरील पटांगणात सायं 5 ते 8 यावेळेत धरणे आंदोलन छेडण्यात आले. महाविकास आघाडीचे नेते या आंदोलनाला उपस्थित होते. राहुल गांधी तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है” अशा घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला होता.
राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ “डरो मत” आंदोलनासाठी शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख डॉ. सुनील पाटील, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दत्ताजीराव मसुरकर, उल्हासरव देशमुख, शेकापक्षाचे किशोर पाटील, अविनाश तावडे, शाम कांबळे, कैलास गायकवाड, रविंद्र रोकडे, राष्ट्रवादीचे मनेष यादव, अतुल पाटील,माजी नगरसेवक तुकारामशेठ साबळे,सचिन पवार, काँग्रेसचे रिचर्ड जाँन, रेखा जाधव, सुनिता पाटील, अरूण गायकवाड, अँड.संदेश धावारे, सागर जाधव, शिवसेनेचे दिलीप पुरी, अनिता पाटील, जैबुनिसा शेख, कविता पाटील, किशोरी शिगवण, अदिती पवार, संगीता गुरव, आम आदमी पार्टीचे शेखर जांभळे आदीप्रमुखासह मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रविण क्षिरसागर यांनी प्रास्ताविकातून राहुल गांधी यांच्यावर केलेल्या अन्यायाचा पाढा वाचून दाखवत घर गेला तरी चालेल परंतु जनतेच्या मनातून काढू शकत नाही इशारा भाजपाला दिला आहे. गौतम आदानीला 20 हजार कोटी कोणी दिला हा बाँम्ब संसदेत राहुल गांधी यांनी फोडल्यावर नक्की कोण असेल हे आपण सुज्ञ मंडळी समजू शकता असे शाम कांबळे यांनी सांगत 1965 साली सुप्रीम कोर्टाने संसदेस संकेत दिले होते की, निवडणूक किंवा कुठल्याही कार्यक्रमात जेव्हा नेते मंडळी भाषण करतात तेव्हा ते एका वातावरणात असतात त्याबद्दल एखादी केस कोर्टात दाखल होते तेव्हा तुम्ही त्याकडे मोकळेपणाने पाहिले शिक्षा दिली नाही पाहिजे असे जुडीशयन सांगितले होते. तर 2019 साली रहुल गांधी यांच्याविरोधात बदनामीची तक्रार दाखल आणि मागील आठवड्यात दोन वर्षाची शिक्षा सुनावत खासदारी रद्द केल्याचा निषेध शाम कांबळे यांनी केले.
देश स्वातंत्र्य झाल्यानंतर सत्तेत असताना सत्याग्रहाची अशाप्रकारचा कार्यक्रम कमी पाहिले असल्याचे राष्ट्रवादीचे नेते दत्ताजीराव मसुरकरांनी सांगत राहुल गांधी यांची केस पाहिली असता सामान्य माणसालाही वाटत राहुल गांधी यांच्याबाबत चुकीच घडलं आहे.वर्षानुवर्षे चालू असलेल्या केसेस निकाल लागत नाही पण राहुल गांधी यांचा निकाल तातडीने लागल्याचेही मसुरकर म्हणाले



