हिंजवडी, दि. 5 – हिंजवडी – वाकड ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री म्हातोबा देवाचा उत्सव आज पारंपरिक बगाड मिरवणुकीने सुरू होणार आहे. हिंजवडीवरून वाकडच्या मंदिरापर्यंत निघणाऱ्या या मिरवणुकीमुळे हिंजवडी आयटीपार्कच्या वाहतूक मार्गात काही बदल करण्यात आले आहेत.
शेकडो वर्षांपासून चालत आलेली हिंजवडीतील म्हातोबा देवाच्या बगाडाची मिरवणूक यंदा कोरोनाच्या संकटामुळे रद्द करण्याचा निर्णय हिंजवडी वाकड ग्रामस्थांनी घेतला आहे. हिंजवडी वाकड ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या म्हातोबा देवाचा उत्सव दरवर्षी चैत्र पौर्णिमेला मोठ्या उत्साहात परंपरेनुसार साजरा होत असतो. मनोरंजनाच्या कार्यक्रमाबरोबर बगाडाची मिरवणूक व काटेरी पालखी, असे या उत्सवाचे खास आकर्षण असते. हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातुन हजारो भाविक हिंजवडी ला येत असतात.
दुपारनंतर हिंजवडी गावठाण ते भूमकर चौकाकडे तसेच हिंजवडीच्या शिवाजी चौकातील वाहतूक विनोदे वस्ती मार्गे वळविण्यात येणार आहे. दरम्यान बगाड मिरवणुकीसाठी लागणारे शेले घेऊन शेलेकरी मंगळवारी रात्री हिंजवडीत दाखल झाले आहेत. प्रत्येक गावोगावी त्यांचे स्वागत करण्यात आले. गावोगावी महिलांनी शेलकऱ्यांचे औक्षण करून त्यांना शेलकऱ्यांचे औक्षण करून त्यांना ओवाळले. तसेच शेलेला नारळ फोडून शेलकऱ्यांना मिठाई भरवून त्यांचे तोंड गोड केले. तर अनेक भाविकांनी जागोजागी चहा नास्ता तसेच पाणी बॉटल देऊन शेलकऱ्यांचे स्वागत केले.
बुधवारी दिवसभर बगाड रथ तयार करून त्यावर शेले चढविण्याचे काम गावातील सुतार मंडळी व जुन्या जाणत्या लोकांनी केले. सज्ज झालेला हा रथ गुरुवारी दुपारी बगाड मिरवणुकीसाठी गावठाणात आणला जाईल. सायंकाळी 4 वाजता मिरवणुकीला प्रारंभ होईल. तत्पूर्वी गळकऱ्यांची निवड करण्यात येईल व त्यास वाजत गाजत होळी पायथ्याला आणून गळ टोचला जाईल. हा अविस्मरणीय व नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने भाविक हिंजवडीला येणार असल्याने पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे.




