नायजेरियाच्या उत्तर पश्मिमेकडील बेन्यूमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील काही लोकांनी जमिनीच्या वादातून भर बाजारात येऊन अंधाधूंद गोळीबार केला. त्यामुळे गर्दी असणाऱ्या बाजारात एकच खळबळ उडाली. या गोळीबाराच्या घटनेत तब्बल 47 लोक ठार झाले. या घटनेच्या एक दिवस आगोदर याच बंदूकधारी लोकांनी तीन जणांची हत्या केली होती. त्यामुळे मृतांची संख्या 50 झाली आहे.
या घटनेची कोणत्याही दहशतवादी संघटनेचा होत नाही. मात्र, नायजेरियात या घटनेनंतर दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. काही स्थानिक मेंढपाळांनी हा हल्ला केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत.
उत्तर मध्य नायजेरियामध्ये जमिनीचे वाद सुरू आहेत. या वादातून मेंढपाळ आणि शेतकऱ्यांमध्ये अनेकदा हाणामाऱ्या झाल्या आहेत. त्यामुळे हा हल्ला या मेंढपाळांनी घडवून आणला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे.




